अहमदनगर- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील कर्हेघाट परिसारातील एका ट्रकवर कारवाई केली आहे. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून पंजाब राज्यातुन आणण्यात आलेला 34 लाखांचा दारूसाठा जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.
शिर्डीत ३४ लाखांच्या दारूसह दोन आरोपी अटकेत - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग
संगमनेर तालुक्यातील कर्हेघाट परिसारात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत अवैध दारुने भरलेल्या ट्रकमधून अंदाजे ३४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकचा चालक आणि मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे.
![शिर्डीत ३४ लाखांच्या दारूसह दोन आरोपी अटकेत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4257734-853-4257734-1566906630282.jpg)
नाशिक मार्गे संगमनेर कर्हेघाटात हॉटेल कृष्णा गार्डन सायखिंडी फाटा या ठिकाणी अवैध दारुने भरलेला ट्रक जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मुंबई येथील विशेष भरारी पथकाने सापळा रचून एक आयशर ट्रक (एमपी 09 जीएफ 3337) तुन रॉयल पटियाळा व्हिस्कीचे एकूण 5500 बॉक्स दारू जप्त केली. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 34 लाख रूपये असून एक मारूती एसक्रॉस कारसह अंदाजे 51 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचा चालक आणि मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे.
TAGGED:
two arrested in shirdi