पाथर्डी (अहमदनगर) - कासार पिंपळगाव (ता.पाथर्डी) येथे वृध्देश्वर सहकारी कारखाना परिसरामध्ये दोन व्यक्ती हे त्यांच्या जवळील विनानंबरची मोटारसायकलवरुन गोणीमध्ये दोन तलवार व गावटी कट्टा घेवून विक्रीसाठी येणार आहे. ही गोपनिय माहिती दिलीप पवार (पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर) यांना मिळाली. त्या नंतर त्यांनी सापळा रचून त्या संशयित व्यक्तींना पकडले.
यावेळी एक देशी बनावटीचे पिस्टल, जीवंत काडतूस, २ तलवारी, एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण ४१,२०० / -रु . किमतीचे मुद्देमाल जप्त केला. अकाश अण्णा फुलारी (वय- २२ वर्षे , रा . कासार पिंपळगाव ता.पाथर्डी जि.अ.नगर) आणि किरण नामदेव फुलारी (रा.कासार पिंपळगाव ता.पाथर्डी जि.अ.नगर) अशी आरोपींची नावे आहेत.