अहमदनगर (शर्डी) -गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती. यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. दरम्यान, या गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुबाडणारे चोरटेही येथे आले होते. दरम्यान, कर्जत पोलीसांच्या नजरेतून चोरटे सुटले नाहीत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातून लावलेल्या ट्रॅपमधून अगदी सहा तासांमध्ये एक नव्हे तर तब्बल वीस सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या ताब्यात.
असंख्य सराईत चोरटे - गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथ यात्रा भरली नव्हती. मात्र, यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. गर्दीचा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी, दागिने, रोकड, चोऱ्या करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र 'नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथयात्रा उत्साहात पार पाडायची' असा संकल्प करून कर्जत पोलीस मैदानात उतरले होते. कुठेही गोंधळ होऊ नये, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी उत्कृष्ट नियोजन कर्जत पोलिसांनी केले होते.