महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी : कोट्यवधीची उलाढाल.. तरीही साई मंदिरात काम करणारे कर्मचारी पगारापासून वंचित - lockdown latest news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदी दरम्याने देणगी न मिळाण्याले शिर्डीच्या साई मंदिरातील कायम कामगारांच्या पगारी अजून झाल्या नाहीत. तर कंत्राटी कामगारांच्या पगारी नोव्हेंबर 2019 पासून थकीत आहेत. या लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.

sai temple
साई संस्थान

By

Published : Jun 20, 2020, 7:23 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोट्यवधींची उलाढाल असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना आपला पगार मिळविण्यासाठी झटावे लागत आहे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळणारा पगार आज महिना उलटून 15 दिवस झाले तरी मिळाला नाही, तर दुसरीकडे पाणी वाटप करणाऱ्या बत्तीस कर्मचाऱ्यांना नोहेंबर महिन्यापासून पगार मिळाला नाही. संस्थानाने लवकरात लवकर पगार करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहे.

आपल्या व्यथा मांडताना कर्मचारी
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी सुरू करण्यात आली. यामुळे शिर्डी साईबाबा मंदिर ही भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद असल्याने भाविकही शिर्डीत येत नसल्याने संस्थानच्या देणगीवर मोठा परिणाम झाला झाला. पण, या काळातही कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, साई संस्थानला या काळात देणगी कमी येत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे हा प्रश्न संस्थान पुढे उभा आहे. मात्र, या पूर्वी भाविकांकडून आलेल्या देणग्यांची वेळोवेळी एफ.डी.(मुदत ठेव) रक्कम विविध राष्ट्रीय बँकेत करण्यात आली आहे. त्यातील मुदत पुर्ण होण्यापूर्वी काही एफडीतून कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले होते. मात्र, आता मे महिन्याचा पगार आज (20 जून) उजाडूनही करण्यात आलेली नाही. त्यात कायमस्वरुपी आणि कंत्राटी अशा सर्वच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे साई संस्थानकडे कंत्राटी पध्दतीने प्रामुख्याने भक्तांना दर्शन रांगेत पाणी वाटपाच काम करत असलेल्या सुमारे बत्तीस कर्मचाऱ्यांचा पगार हा गेल्या नोव्हेंबर (2019) महिन्यापासून करण्यात आलेला नाही. त्यासाठी त्यांनी संस्थान कार्यालयात अनेकदी संपर्क करुनही उपयोग झालेला नाही, असे तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.
देशभरात टाळेबंदी असल्याने मागील नव्वद दिवसांपासून साईसमाधी मंदिर बंद आहे. एरव्ही दररोज लाखो भक्तांची वर्दळ असलेली शिर्डी ओस पडली आहे. दुसरीकडे साईसंस्थानचा दैनंदिन लाखो रुपयांचा इतर कामांसाठी खर्च केले जातो. तोही अनिवार्य आहे, खर्चात कपात म्हणून साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साईनाथ हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा इन्सेन्टिव्हही बंद केला आहे. तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात चाळीस टक्के कपात केली आहे. अनेक कंत्राटी कामगारांना बिनपगारी सुट्या दिल्या आहेत. मात्र, ज्यांचा केवळ वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, त्यांचे पगार थांबवण कितपत योग्य आहे. यावर प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत साई संस्थानची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दोन्ही पगारांचा विषय व्यवस्थापन समिती समोर ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.हेही वाचा -सख्खे शेजारी पण पक्के राजकीय वैरी; विखें-थोरातांमध्ये पुन्हा संघर्ष

ABOUT THE AUTHOR

...view details