अहमदनगर-इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल कराव अशी मागणी कलेली आहे. या मागणीनंतर तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई अहमदनगरमध्ये येत आहेत. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये इंदोरीकर महाराज किंवा त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची हिम्मत दाखवावी आव्हान दिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये पुढे 'बुलाती है मगर आने का नही... असेही लिहिले आहे.
इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलेली आहे. या मागणीनंतर तृप्ती देसाई यांच्यावर थेट इंदोरीकर महाराजांनी कोणतेही वक्तव्य केले नसले तरीही महाराजांच्या असंख्य समर्थकांकडून सोशल माध्यमांमधून तृप्ती देसाई यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. देसाई यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे थेट तक्रार करून आपण एक महिला असताना महाराजांच्या सांगण्यावरून त्यांचे समर्थक आपल्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी करत आहेत. समाज माध्यमांमधून माझ्याबद्दल चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहेत. तसेच भिंगार येथील एक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनीही आपल्याबद्दल अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून आपल्यावर खालच्या पातळीची टीका केलेली आहे अशी तक्रार केली आहे.