सुपा टोलनाक्यावर अडवल्यानंतर पोलिसांनी तृप्ती देसाईंना आपल्या ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी अडवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तिथेच घोषणाबाजी सुरू केली होती. त्यामुळे कायदा आणि सुवव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
LIVE : शिर्डीत आंदोलनासाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात.. - Trupti Desai
12:42 December 10
तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात..
12:28 December 10
तृप्ती देसाईंना सुप्यात अडवलं..
तृप्ती देसाईंनी सुपे टोलनाक्याजवळ पोलिसांनी अडवलं आहे. शिर्डीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना अडवण्यात आलं आहे.
12:14 December 10
रांजणगावमध्ये न्याहरी करुन शिर्डीकडे रवाना..
रांजणगावमध्ये न्याहरी करुन तृप्ती देसाई आता शिर्डीकडे रवाना झाल्या आहेत. देसाई यांच्यासोबत दहा महिला आणि पाच पुरुष आंदोलक आहेत.
10:08 December 10
..तर आम्ही जल्लोष करणार- ब्राम्हण महासंघ
शिर्डीत येऊन संस्थानने लावलेले फलक काढणारच अशी भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घेतल्याने त्यांना विरोध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाच्या महिला शिर्डीत दाखल झाल्या असून तृप्ती देसाई यांनी फलक काढण्याचे धाडस करू नये, त्या शिर्डीत आल्यातर आम्ही त्यांना फलकापर्यंत पोहोचू देणार नाही आणि त्या येवू शकल्या नाहीत, तर आम्ही जल्लोष साजरा करणार, असे ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत. आता ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते शिर्डीत एकत्र जमले असुन साई मंदीराला एक फेरी मारणार आहेत.
09:25 December 10
शिर्डीत सुरक्षा व्यवस्था वाढवली..
शिर्डीतील ड्रेसकोडचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. तर दुसरीकडे, देसाई शिर्डीत आल्यास ब्राम्हण महासंघाबरोबरच शिर्डी शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनीही त्यांना विरोध करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, शिर्डीच्या सर्वच सीमांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
08:37 December 10
तृप्ती देसाई शिर्डीला रवाना..
तृप्ती देसाई या आंदोलनासाठी शिर्डीला रवाना होत आहेत. अवघ्या काही वेळातच त्या आपल्या समर्थकांसह बाहेर पडतील.
08:25 December 10
आजच्या आंदोलनाच्या नियोजनाबाबत सांगतायत तृप्ती देसाई..
06:44 December 10
साई मंदिर पोशाख वाद : शिर्डीत आंदोलन करण्यावर तृप्ती देसाई ठाम..
शिर्डी (जि. अहमदनगर)येथील साईबाबादेवस्थान परिसरात पोशाख संबंधी फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी (दि. 10 डिसें.) सकाळी साडेआठ वाजता शिर्डीसाठी रवाना होणार आहेत. बंदी असली तरी शिर्डीला जाणारच देसाईंचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सातारा रोडवर धनकवडी येथे असलेल्या निवासस्थानातून त्या गुरुवारी सकाळी शिर्डीला जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांना शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली आहे.
शिर्डी संस्थानने लावलेला फलक अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधातील आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते, असे देसाईंचे म्हणणे आहे. संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही शिर्डीत जाणारच, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.