अहमदनगर- पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील मालपाणी गोडाऊनजीक ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात अकोले तालुक्यातील कळस येथील अशोक सोमनाथ वाघ आणि त्यांची तीन वर्षांची चिमुरडी शकुंतला अशोक वाघ या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आशाबाई अशोक वाघ आणि त्यांचा एक नातेवाईक दिलीप भाऊसाहेब मेंगाळ या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
ट्रक-दुचाकी अपघात, बाप-लेक जागीच ठार - Ravindra Mahale
अहमदनगर - यात्रेहून स्वगावी परतताना काळाने घातला घाला. ट्रक-दुचाकीच्या अपघातात बाप-लेक जागीच ठार झाले. दोन गंभीर जखमी झाले असून ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अपघातग्रस्त दुचाकी
अपघातग्रस्त दुचाकी, ट्रक आणि पोलीस ठाणे
संगमनेर शहरालगत असणाऱ्या कासारवाडी येथील नातेवाईकांकडे यात्रेनिमित्त ते आले होते, यात्रेवरून दुचाकीवर स्वगावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मोटारसायकल (क्र. MH -१५ AR ६०६६) आणि ट्रक (क्र. - MH ४३ U ७४९१) यांच्यात हा अपघात झाला. नाशिकहून सिमेंटचे ठोकळे घेऊन हा ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता, चालक विशाल संतोष वाघ याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याच ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला होता.