अहमदनगर - दिवाळीची चाहूल लागली की सवत्र फराळ बनविण्याची लगबग सुरु होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या आदिवासी बहुल तालुक्यातील आदिवासी महीलांही आपल्या शेतात उगलेल्या पारंपरिक पिकापासुन दिवाळीचे फराळ बनवत आहे.
आदिवासी महिला आपल्या पारंपरिक शेतीतुन निघणाऱ्या धान्यापासून बनवतायत दिवाळीचे फराळ - दिवाळीची चाहूल
दिवाळीचे फराळ म्हटला की चिवडा, चकली, लाडू करंज्या असा बेत आखला जातो काही वर्षांपूर्वी पर्यंत या फराळाचं खूप अप्रूप असायचं. हल्ली मात्र चॉकलेट्स, कुकीज, पिझ्झा आणि बर्गर याची आवड दिसते. दिवाळीपासून थंडीची चाहूल लागते. वाढत्या गारव्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीराला जास्तीच्या कॅलरीजची आवश्यक असल्याने दिवाळी या सणासाठी बनविल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरी भरपूर असतात.
दिवाळीचे फराळ म्हटला की चिवडा, चकली, लाडू करंज्या असा बेत आखला जातो काही वर्षांपूर्वी पर्यंत या फराळाचं खूप अप्रूप असायचं. हल्ली मात्र चॉकलेट्स, कुकीज, पिझ्झा आणि बर्गर याची आवड दिसते. दिवाळीपासून थंडीची चाहूल लागते. वाढत्या गारव्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीराला जास्तीच्या कॅलरीजची आवश्यक असल्याने दिवाळी या सणासाठी बनविल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरी भरपूर असतात. त्यामुळे कोणता पदार्थ आरोग्यासाठी चांगला आहे. हेच पारंपारीक न्यानाचा उपयोग अकोले तालुक्यातील काही आदिवासी महिलांनी करत आपल्या शेतात येणाऱ्या पिकाचा धान्यांपासून वरई, नाचणी,भात, बाजरी, ज्वारी, यापासुन दिवाळीचे फारळ बनविण्यास सुरवात केली आहे.
अकोले येथील कळसुबाई मिलेट फार्मर्स कंपनीच्या माध्यमातुन आदिवासी महिला एकत्र येत या आदिवसी महीला सध्या देसी घी कुकीज, ज्वारी शेव नाचणी शेवचिवडा , नाचणी देशी घी लाडू , मल्टी मिलेट पराठा असे पदार्थ बनवितायेत. घरगुती पध्दतीने बनविलेला आणि आरोग्यदायी असे दिवाळीचे जरा हटके मिलेट फराळ बाजारात विक्रीसाठी आता उलब्ध झाला आहे. कळसुबाई मिलेट या शेतकरी गडा मार्फत सुरु झालेल्या या नविन प्रयोगामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळा बरोबरच आदिवासी महिलांना रोजगार उलब्ध होवुन आरोग्यदायी मिलेटच्या संवर्धनास मदत होणार आहे.