महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाकाळात ‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान - कर्जत जामखेडमध्ये फिरता दवाखाना

अहमदनगर- कोरोनाकाळात ‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान; आ.रोहित पवारांचा उपक्रम

‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान
‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान

By

Published : May 24, 2021, 8:38 AM IST

अहमदनगर- कोरोना संकटकाळात कर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात ‘फिरता दवाखाना’ हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या अनेक सर्वसाधारण रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे नियमित आजारांवर तपासणी, निदान आणि उपचार यासाठी रुग्णांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या उपक्रमाला तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून गेल्या चार महिन्यात ११ हजारहून अधिक लाभार्थ्यांना मोफत घरपोच प्राथमिक उपचार व औषधे देण्यात आले आहेत. या उपक्रमाचे कर्जत व जामखेडमधील वयोवृध्द, गर्भवती महिला व विकलांग नागरिकांकडून कौतुक होत आहे.

‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान
साथरोगात इतर आजारांकडे दुर्लक्ष नको-

तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाला आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी विविध प्रभावी उपाययोजना आमदार रोहित पवार कर्जत व जामखेड तालुक्यात राबवण्याचा संकल्प केला आहे. कोरोना काळातील निर्बंधांमुळे काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास विविधप्रकारे अडथळा येतो. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये, याकरिता आमदार पवारांनी ‘फिरता दवाखाना’ हा उपक्रम चार महिन्यांपूर्वी सुरू केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कर्जत-जामखेडवासीयांसाठी उपयुक्त ठरत आहे.

‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान
फिरत्या दवाखान्यात तज्ञ डॉक्टरांचे पथक-

कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन मोबाईल क्लिनीक व्हॅन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करते. 'मोबाईल क्लिनिक' व्हॅनसोबत तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तैनात असून नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथिमक उपचार करून त्यांना औषधे देण्यात येतात. केवळ इतकेच नव्हे तर व्हॅनमध्ये असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेद्वारे रक्तदाब, मधुमेह तपासणी देखील करण्यात येत आहे. चार महिन्यात कर्जत व जामखेडमधील ११ हजारहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. गावागावांतील वयोवृध्द नागरिक, विकलांग व्यक्ती तसेच गर्भवती महिलांना या कोरोनाच्या काळात मोफत घरपोच औषधोपचार दिले जात आहेत. ही मोबाईल क्लिनिक व्हॅन व अन्य यंत्रणा तालुका आरोग्य विभागासाठी उपयुक्त ठरत असून कर्जत व जामखेडमधील गावांना आरोग्यसुविधेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details