शिर्डी :शिर्डी साईबाबा संस्थानच्या (Sai Sansthan) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (Chief Executive Officer) भाग्यश्री बानायत यांची गेल्या दीड वर्षा पूर्वी नियुक्ती झाली होती. गेल्या दीड वर्षांमध्ये त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले होते. काही ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती. त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी साई संस्थानचा कारभार कशा पद्धतीने चांगल्या करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. संस्थान मधली प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.
Shirdi : आता साईबाबा संस्थानच्या खजिन्याची चावी कोणाकडे ? भाग्यश्री बानायत यांची नागपूरला बदली - भाग्यश्री बानायत
शिर्डी साईबाबा (Sai Sansthan) संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची आज नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली असुन याबाबतचे आज राज्य सरकारने आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा चर्चेला सोशल मिडीयावर उधाण आले आहे.
देशातील एक नंबरचे आणि राज्यातील दोन नंबरचे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईबाबा देवस्थानमध्ये साईबाबांच्या ठिकाणी मला सेवा करण्याची एक प्रकारे संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. प्रशासकीय पातळीवर जे जे काही चांगले उपक्रम राबवता येईल ते राबवले. मी मूळची नागपूरची असून माझी नागपुर विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. आता घरी जायला मिळाले आहे. शिर्डी या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली यातच मी आनंद मानते अश्या यावेळी बानायत म्हणाल्या आहे.