महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा इफेक्ट; हिवरेबाजारला पर्यटकांनी येणे टाळावे, ग्रामस्थांचे आवाहन - corona hivrebazar

विविध योजनांची माहिती घेण्यासाठी राज्यासह देशातील विविध भागातून पर्यटक रोजच हिवरेबाजार या गावात येत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळने आवश्यक आहे. त्यामुळे, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिवरेबाजार ग्रामस्थांनी पर्यटकांना गावात न येण्याचे आवाहन केले आहे.

poatrao pawar hivrebazaar
हिवरेबाजार

By

Published : Mar 16, 2020, 6:31 PM IST

अहमदनगर- जिल्ह्यातील राळेगणसिद्धी पोठोपाठ हिवरेबाजार ही गावे अख्या देशासाठी ग्रामविकासाची आदर्श केंद्र बनली आहेत. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राळेगणसिद्दी पाठोपाठ हिवरेबाजार येथील ग्रामस्थांनी पर्यटकांना गावात न येण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असून त्याची माहिती आदर्श ग्राम हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना देण्यात आली आहे.

माहिती देताना हिवरेबाजार गावाचे सरपंच पोपटराव पवार

४ दिवसांपूर्वीच राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा पर्यटकांनी सध्या गावात न येण्याचे आवाहन केले होते. त्यापाठोपाठ आता हिवरेबाजार गावनेही तसाच निर्णय घेतला आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्राम संस्कृती, जलसंधारणाची कामे पाहण्यासाठी आणि विविध योजनांची माहिती घेण्यासाठी राज्यासह देशातील विविध भागातून पर्यटक रोजच गावात येत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळने आवश्यक आहे. त्यामुळे, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिवरेबाजार ग्रामस्थांनी पर्यटकांना गावात न येण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा-कोरोना : परिक्रमेची माहिती घेऊन आयोजकांवर कारवाई करणार - प्रांताधिकारी गोविंद शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details