अहमदनगर -अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पर्यटकांची गाडी बुडाली. ही घटना काल मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. यात कार चालक सतीश घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कोल्हापूर भागातील उद्योजक समीर राजूरकर व गुरू सत्यराज शेखर हे पर्यटक आपल्या कारमधून पुण्याहून अकोले तालुक्यातील कळसुबाई येथे पर्यटनाला आले होते. काल उशिरा रात्री दोनच्या सुमारास पर्यटक रस्ता चुकल्याने ते कोतुळ-अकोले रस्त्यावरून जात होते. रस्त्यावरील पूल धरणाच्या पाण्याखाली अल्याने पुलावरून कार जात असताना ती पाण्यात बुडाली.