अहमदनगर -श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने माजी साहित्यिक लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी आघाडी आणि युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळेंना आमदारकीसाठी बळ दिले. मात्र, जयंत ससाणेंच्या अखेरच्यावेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ससाणे गटात नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत कांबळेंना त्यांच्याच मतदारसंघातुन कमी मते मिळाली होती. विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदलली होती. ती विधानसभेवेळीही पुन्हा एकदा बदलली आहे. आता भाऊसाहेब कांबळे यांनी हाती शिवबंधन बांधले आणि सेनेने त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यांच्या बरोबर तालुक्यातील विखे समर्थक आहेत. त्याचबरोबर, एकेकाळी विखेंचे विरोधक असलेले भानुदास मुरकुटे यांची ताकद आहे. कांबळेंना विखे-मुरकुटेंची साथ असली तरी ससाणे गट आणि शिवसेनेचा एक गट अद्यापही नाराज आहे. तरी, आपण केलेल्या विकासाच्या मुद्यावर कांबळे तालुका पिंजुन काढताय.
हेही वाचा -...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत