अहमदनगर - सोमवारी दिवसभरात तब्बल 72 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा एक हजार झाला असून, सध्याची संख्या 1 हजार 35 अशी झाली आहे. आता बहुतेक सर्वच तालुक्यांत कोरोनारुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण 360 आहेत. बरे झालेले रुग्ण 649 असून, आता पर्यंत एकूण 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये रोजच 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात 23 रुग्ण पाॅझिटिव्ह होते. त्यातील नगर शहरात 15, श्रीगोंद्यात 7, पारनेरमध्ये 1 असे रुग्ण होते. रात्री उशिरा आलेल्या अहवालात मात्र 49 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये 6 पाॅझिटिव्ह आले. तर खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 43 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 3 तर श्रीगोंदे येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.
कोणत्या ठिकाणी किती रुग्ण आढळले?
नगर शहरातील विनायकनगर 4, शाहुनगर 1, श्रीरामनगर 1, सुभेदार गल्ली 1, भवानीनगर 1, सावेडी 3, कावरे मळा 1, नगर शहर 5 असे एकूण 17 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. नगरच्या उपनगरातील पितळे काॅलनी येथे 1 रुग्ण आढळला आहे. पोखर्डी येथेही 1 रुग्ण आढलून आला आहे. संगमेर तालुक्यातील घुलेवाडी, मालदाड रोड, भारत नगर, जनता नगर, निमोण, जोर्वे रोड, रहमद नगर, आरगडे गल्ली आदी ठिकाणी 11 रुग्ण आढळले. राहाता तालुक्यातील शिर्डी येथे 1, पिंपरी निर्मळ येथे 1, सोनगाव पठारे 1, कानकुरी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव 1, तामर खेडा 1, राहुरी शहर 1 असे एकूण 3 रुग्ण आढळले. श्रीगोंदे तालुक्यातील चिखली 1, श्रीगोंदा शहर 1 असे एकूण 2 रुग्ण आढळले आहेत. श्रीरामपूरमधील ममदापूर येथे 1 रुग्ण आढळून आला असून, अकोले 1, भिंगार 1, पाथर्डीतील त्रिभुवनवाडी येथे 1 रुग्ण आढळला आहे.
नगर शहरात लागू शकतो पूर्ण लॉकडाऊन -
जामखेड तालुक्यात गुरुवारपासून जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर शहरातही तसा प्रस्ताव दाखल झाला आहे. मनपा आयुक्तांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. प्रस्ताव मंजुर होताच नगरमध्ये जनता कर्फ्यू सुरू होणार आहे. अकोले शहरात एक रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून अकोले शहर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.