महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष; उद्या मुख्यमंत्र्याची बैठक

उत्तर नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत आंदोलने सुरू झाली आहेत. यात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष पेटु लागला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले  आहे

By

Published : Jun 10, 2019, 8:01 PM IST

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष; उद्या मुख्यमंत्र्याची बैठक

अहमदनगर -उत्तर नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत आंदोलने सुरू झाली आहेत. यात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष पेटु लागला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. उद्या राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच आयोजन केले आहे.


तब्बल 182 गावातील नागरिकांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या मुखा जवळील कालव्यांची कामे सुरु करा, अशी मागणी घेऊन गेल्या आठवड्यात तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रश्नावर न्यायालयातही दाद मागण्यात आली होती.

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष; उद्या मुख्यमंत्र्याची बैठक


अकोले तालुक्यातील कालव्यांसाठी संपादन झालेल्या जमिनीवर खुले कालवे न करता ते बंदिस्त स्वरुपात करावे, अशी मागणी अकोल्यातील शेतकऱ्यांनी आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी मधुकर पिचडांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी तेथील काम बंद पाडले होते.
आज हिच मागणी घेऊन निळवंडे धरणाच्या जवळील निब्रळ येथील शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह करण्याचे ठरवले. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन कालव्यांच्या कामासाठी आखणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.


हा प्रश्न जास्त चिघळु नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या एका बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये मधुकर पिचड, राधाकृष्ण-विखे तसेच शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना आमंत्रित केले आहे. कालव्याची कामे सुरु व्हावी, अशी विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांची मागणी आहे. तर कालवे हे भूमिगत व्हावे, अशी पिचड यांची मागणी आहे. आता उद्याच्या बैठकीत काय मार्ग निघतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details