महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांची उद्या शिर्डीमध्ये सभा, विखे-पाटील गैरहजर राहण्याची शक्यता? - Loksbha Election

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन उद्या (बुधवार) कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे करण्यात आले आहे.

विखेंच्या गैरहजेरीत शरद पवारांची उद्या शिर्डीमध्ये सभा

By

Published : Apr 23, 2019, 6:02 PM IST

Updated : Apr 23, 2019, 6:10 PM IST

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे उद्या (बुधवारी) कोपरगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही सभा होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष आघाडीचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आल्याची आशुतोष काळे यांनी माहिती दिली. दरम्यान, या सभेसाठी विखेंचे होमपीच असूनही या सभेला ते गैरहजर राहण्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांची प्रथमच कोपरगावमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेला छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब थोरात, अशोक काळे, डॉ. सुधीर तांबे, उमेदवार भाऊसाहेब कांबळे, सत्यजीत तांबे, भानुदास मुरकुटे, आशुतोष काळे, वैभव पिचड, अविनाश आदिक, करण ससाणे, आदि उपस्थित राहणार आहेत.

Last Updated : Apr 23, 2019, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details