अहमदनगर - दिवंगत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोणीमध्ये कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-सेना नेत्यांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले.
प्रवरा परिवार आणि लोणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांच्या जयंतीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधान आले आहे.
बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्याला भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती - congress
दिवंगत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोणीमध्ये कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-सेना नेत्यांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले.
बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्याला भाजप नेत्यांची उपस्थिती
गेल्या अनेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आज विखे पाटलांच्या कार्यक्रमात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने उपस्थितीतांमध्ये चर्चा रंगू लागली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे आदी नेत्यांची उपस्थिती होती.