महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

2023 पर्यंत दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हेच आपले प्रथम उद्दिष्ट- महसूल मंत्री - Nilwande dam developement

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाला 2023 पर्यंत पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. धरणाच्या सुरुवातीपासून भिंत, कालव्यांची कामे व मोठी बोगदे यासाठी थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

Balasaheb Thorat news
बाळासाहेब थोरात न्यूज

By

Published : Mar 13, 2021, 10:23 PM IST

शिर्डी (अहमदनगर)- निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला लवकरात लवकर देणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. 2023 पर्यंत दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे हेच आपले प्रथम उद्दिष्ट आहे. म्हणून श्रेय वादापेक्षा निळवंडेचे खरे मित्र कोण हे आतातरी ओळखा असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी चालू अर्थसंकल्पातून 476 कोटींची भरीव तरतूद केल्याबद्दल कृती समितीच्या वतीने नामदार थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे , उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, गोपीनाथ घोरपडे, दादासाहेब पवार, जालिंदर लांडे, डॉ. रवींद्र गागरे, मच्छिंद्र येलम, रावसाहेब कोल्हे, रवींद्र वरपे, अरुण पोकळे ,डॉ. एकनाथ गोंदकर ,सौ लताताई डांगे, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, राधाकृष्ण डांगे, विजय ढोकचौळे, एल. एम. डांगे, अण्णासाहेब वाघे, किरण गव्हाणे, संजय शेटे व सोपानराव जोंधळे आदी सहा कृती समितीचे विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा-आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे? पाहा, काय म्हणतायेत डॉ. सीमा बनसोडे

दुष्काळी भागाला 2023 पर्यंत पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले-

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाला 2023 पर्यंत पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. धरणाच्या सुरुवातीपासून भिंत, कालव्यांची कामे व मोठी बोगदे यासाठी थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या कामाचे श्रेय नियतीने थोरात यांच्याकडे दिले आहे. मंत्री थोरात हे काम पूर्ण करणार असल्याचा विश्वास कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा-सचिन वझेंना अंतरिम संरक्षण नाही; पाहा आज दिवसभरात काय-काय घडलं


विना प्रसिद्धी कालव्यांच्या कामाला गती
यावेळी महसूल मंत्री थोरात म्हणाले की, निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने पूर्ण होऊन 2023 पर्यंत दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपले एकमेव उद्दिष्ट आहे. कालव्यांची कामे करणे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण कधीही निळवंडे धरण व कालवे याबाबत राजकारण केले नाही. हे काम पूर्ण होणे हेच आपले उद्दिष्ट आहे. ते नियतीने आपल्या हातून करून घेतले आहे. म्हणून मी कधीही श्रेयवाद किंवा प्रसिद्धी केली नाही. 1999 मध्ये पाटबंधारे मंत्रीपदाची प्रथम शपथ घेतल्यानंतर या कामाला सुरुवात केली. अनेक अडथळ्यांवर मात करून धरण पूर्ण झाले. बोगद्यांची मोठी कामे मार्गी लावली. आताही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून विना प्रसिद्धी कालव्यांच्या कामाला गती दिली. कोरोना संकटातही अकोलेमधील 28 किमी पर्यंतचचे कालवे सुरू ठेवले. हे काम तातडीने पूर्ण करुन पाणी देणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details