महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Tirupati Airline Launch in March : तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! तिरूपती शिर्डी विमानसेवा मार्च अखेर होणार सुरु - Shirdi Tirupati Airline Launch in March

उत्तर महाराष्ट्रातून तिरुपतीच्या दर्शनाला जाऊ ईच्छिणाऱ्या भाविकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. शिर्डी साईबाबांचे दर्शन घेवुन आता शिर्डी विमानतळावरुन तुम्ही थेट तिरुपतीला जावु शकणार आहे. तिरूपतीचे लार्ड व्यंकट रमणा गोविंदा आणि श्रध्दा सबुरीवाले शिर्डीचे साईबाबा थेट विमानसेवेने जोडले ( Shirdi Tirupati Airline Launch in March ) जातील.

Shirdi Tirupati New Airline launch
तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर!

By

Published : Mar 15, 2022, 12:54 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - देशातील सर्वात मोठ धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपतीच्या दर्शनाला उत्तर महाराष्ट्रातुन जावु ईच्छिणाऱ्या भाविकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. शिर्डी साईबाबांचे दर्शन घेवुन आता शिर्डी विमानतळावरुन तुम्ही थेट तिरुपतीला जावु ( Tirupati Shirdi Airlines to be launched ) शकणार आहे. तिरूपतीचे लार्ड व्यंकट रमणा गोविंदा आणि श्रध्दा सबुरीवाले शिर्डीचे साईबाबा थेट विमानसेवेने जोडले जातील.

तिकिट बुकिंग सुरू, आठवड्यातील तीन दिवस विमानसेवा -

साईबाबांची शिर्डी आणि देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती दरम्यान येत्या मार्च अखेर पासुन थेट विमानसेवा सुरु झाली आहे. स्पाईस जेट कंपनीने एप्रिल महिन्याच ऑनलाईन बुकींगही सुरु केली आहे. येत्या 29 मार्च पासून स्पाईस जेट कंपनी त्यासाठी नव्वद आसनी विमान सेवा सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवार, गुरूवार आणि शनिवार या तीन दिवस हि विमानसेवा सुरू असेल. त्यानंतर प्रतिसाद लक्षात घेऊन हि सेवा दररोज सुरू ठेवण्याची या कंपनीची तयारी आहे.

अशा आहेत वेळा -

तिरूपती विमानतळावरून दुपारी दोन वाजता हे विमान उड्डाण करील आणि तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शिर्डी विमानतळावर उतरेल. दुपारी चार वाजता पून्हा उड्डाण करून पाच वाजून विस मिनीटांना तिरूपती विमानतळावर उतरेल. एक तास पंचेचाळीस मिनीटांच्या या प्रवासाठी प्रत्येकी 5 हजार 200 रूपये भाडे असेल. आंध्र प्रदेशातून साई दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. वढेच नाही तर भारतात सर्वाधिक साई मंदिरे आंध्र प्रदेशात आहेत. तेथून शिर्डीत येणाऱ्या आरामबसची संख्या सर्वाधिक आहे. दक्षिण भारत आणि विदेशात साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्यात तेथील भाविकांचा महत्वाचा सहभाग आहे. तिरूपतीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत महाराष्ट्रातील भाविकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रातील भाविक तिरूपतीत जाऊन तर दाक्षिणात्य भाविक शिर्डीत येऊन केशदान करतात. या दोन्ही देवस्थानांत नियमीत जाणाऱ्या दर्शनार्थी भाविकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिरूपती शिर्डी विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळेल अशी स्पाईस जेटच्या व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.

हेही वाचा -Hijab Row Verdict : हिजाब हा मुस्लीम धर्माचा अनिवार्य भाग नाही -कर्नाटक उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details