अहमदनगर - 14 जानेवारीला शेवगाव तालूक्यातील नवीन दहिफळ या गावात रात्री 2 वाजल्याच्या सुमारास शेतात मशागत करत असताना, गावातील तरुणाला वाघ दिसल्याचा प्रकास उघडकीस आला. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली. यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी भीत आहेत. तसेचे शाळकरी मुलांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील अनेक शेतकरी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जात असताता. मात्र, परिसरात वाघ असल्याच्या चर्चेमुळे त्यांच्या जिवितेचा धोका निर्मान झाला आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी संबधित वनअधिकारीऱ्यांना या घटनेची माहिती दिली असून वनखात्याचे वनपाल पांडुरंग वेताळ, वनरक्षक आप्पासाहेब घनवट, प्राणी मित्र सुशांत मनवरे, प्राणी मित्र संतोष लाकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा बसवण्यात आला आहे.