अहमदनगर - पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आनंदवाडी शिवारामध्ये ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ७ जण जखमी झालेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहेत. जखमींना संगमनेर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिर्डी-पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात - आनंदवाडी शिवारामध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात
पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारामध्ये एक स्विफ्ट कार, टाटा कार आणि दुधाचा टँकर अशा तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले.
शिर्डी-पुणे- नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारामध्ये एक स्विफ्ट कार, टाटा कार आणि दुधाचा टँकर अशा तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल केले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक एक तासापासून अधीक काळ ठप्प होती.
Last Updated : Aug 25, 2019, 1:10 PM IST