महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळ.. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोना संशयित फरार

कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून आज जिल्हा रुग्णालयात ३ जणांना भर्ती करण्यात आले होते. हे रुग्ण विदेशातून आलेल्या संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेले होते.

ahmednagar corona patient
जिल्हा रुग्णालय अहमदनगर

By

Published : Mar 14, 2020, 10:53 PM IST

Updated : Mar 14, 2020, 11:08 PM IST

अहमदनगर- कोरोनामुळे रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेले ३ रुग्ण काहीही न सांगता आज सायंकाळी रुग्णालयातून निघून गेले. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांना याबाबतची माहिती देत रुग्णांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून आज जिल्हा रुग्णालयात ३ जणांना भर्ती करण्यात आले होते. हे रुग्ण विदेशातून आलेल्या संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेले होते. त्यामुळे या तिघा व्यक्तींना रुग्णालयात निरीक्षणा खाली ठेवण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून ३ पेक्षा अधिक रुग्ण बाहेर गेल होते. मात्र, ३ रुग्ण सोडून बाकी सर्व रुग्ण परत आले. ही गोष्ट लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने ताबडतोब तोफखाना पोलिसांकडे धाव घेतली व लेखी पत्रकाद्वारे या तिघा रुग्णांची माहिती दिली. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी संबंधीत रुग्णांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा-अहमदनगर : कोरोनाची खबरदारी घेत मढी यात्रेस सुरुवात, योग्य नियोजन केल्याचा देवस्थानचा दावा

Last Updated : Mar 14, 2020, 11:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details