अहमदनगर - अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील बाप-लेकी पाठोपाठ पत्नीचा अहवालही आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पती-पत्नी व त्यांची मुलगी असे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले आहे.
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील 45 वर्षीय व्यक्ती आणि त्यांची 18 वर्षीय मुलगी या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. या व्यक्तीच्या पत्नीचाही अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हे सर्व कुटुंबच कोरोनाबाधित झाले आहे. तर, पिंपळगाव खांडमधील कोरोना बाधितांची संख्या 4 आणि अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या 7 झाली आहे.
अकोले तालुक्यात पिंपळगाव खांडमध्ये एकाच कुटुंबातील तिघे 'पॉझिटिव्ह' - अकोलेत एका घरातील तिघे कोरोनाबाधित
हे सर्वजण मुंबई परिसरातून आपल्या गावी आले होते. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोलेसह राजूर, कोतुळ, समशेरपूर, शेंडी, पाडाळने, सावरगाव पाट, वीरगाव, आदी लहान मोठ्या गावांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळण्यास सुरुवात केली आहे. आजपासून तीन दिवस अकोले शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
अकोले