महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये ३६० नव्या रुग्णांची वाढ; ४११ रुग्ण कोरोनामुक्त - 360 कोरोना रुग्ण वाढले

अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी ३६० रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात ४११ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४९७३ वर पोहोचली आहे. ३३६० जण कोरोनामुक्त झाले असून ६८ जणांचा मृत्यू झालाय. सध्या १५४५ जणांवर उपचार सुरु आहेत.

Ahmednagar corona update
अहमदनगर कोरोना अपडेट

By

Published : Aug 1, 2020, 11:15 AM IST

अहमदनगर- जिल्ह्यात शुक्रवारी ३६० कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटिजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनावर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. दिवसभरात ४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३३६० इतकी झाली. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७२.२१ टक्के इतके आहे.

शुक्रवार दुपारपर्यंत ४० कोरोनाबाधित आढळून आले होते. यामध्ये पारनेर १, अकोले ०९, नेवासा ०६, राहाता ०१, भिंगार ०१, नगर शहर १६, श्रीगोंदा ०१, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपुर ०१, कोपरगाव ०३ येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर आढळलेल्या १६ रुग्णांमध्ये संगमनेर ०७, देवाचा मळा ३, आश्वी बु.०१, घुलेवाडी ०३, अहमदनगर शहर ०३ गोविंदपुरा यशवंत नगर ०१, शहर ०१, आगरकर मळा ०१, नगर ग्रामीण ०१ - नेप्ती ,पारनेर ०५ ढवळपुरी ०१, पाडळी दर्या ०१, तिखोल ०२, पारनेर ०१ व्यक्तीचा समावेश आहे.

रॅपिड अँटिजेन चाचणीत १४३ जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर २०, राहाता ०५, पाथर्डी १६, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट १७, नेवासा २६, कोपरगाव १५ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६१ बाधित आढळून आले. मनपा १२४, संगमनेर ०५, राहाता १०, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०३, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१ आणि कर्जत येथील ०३ रुग्णांचा समावेश आहे.

४११ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १८,पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०,शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान,राज्यात शुक्रवारी १०३२० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. रुग्णांची एकूण संख्या आता ४ लाख २२ हजार ११८ अशी झाली आहे. ७५४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ५० हजार ६६२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील कोरोाबाधितांची संख्या
कोरोनामुक्त: ३३६०
उपचार सुरू असलेले रुग्ण: १५४५
मृत्यू: ६८
एकूण रुग्ण संख्या: ४९७३

ABOUT THE AUTHOR

...view details