अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे दुधवडे परिवारावर काळाने घाला घातला आहे.
संगमनेरमध्ये घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यू - अकलापूर
संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे दुधवडे परिवारावर काळाने घाला घातला आहे.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावाअंतर्गत असणाऱ्या मुंजेवाडी येथे गुरुवारी (दि. 9 जून) दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिंघाचा मृत्यू झाला आहे. मृतांमधे 10 वर्षीय बालकाचाही सामावेश आहे.विठ्ठल दुधवडे (वय 75 वर्षे), हौसाबाई दुधवडे (वय 67 वर्षे), साहील दुधवडे (वय 10 वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने मुंजेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्या सोनार बाबाचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू