अहमदनगर -पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील शिवतेज प्रतिष्ठान संचलित चारा छावणीत वीज पडल्याने ३ गाई जागीच ठार झाल्या. यात मीराबाई सुभाष फुंदे यांच्या २ गाई आणि सुभाष लक्ष्मण फुंदे यांच्या मालकीच्या एका गाईचा समावेश आहे.
अहमदनगरमध्ये चारा छावणीवर वीज कोसळल्याने तीन गाई दगावल्या - सुभाष फुंदे
शिरपूर येथील चारा छावणीत आश्रयाला असलेले शेतकरी मीराबाई यांच्या २ गाई आणि सुभाष फुंदे यांच्या मालकीच्या एका गाईचा वीज पडून मृत्यू झाला.
पाथर्डी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊसाच्या सरी कोसळल्या. यावेळी अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर शिरपूर येथील चारा छावणीत आश्रयाला असलेले शेतकरी मीराबाई यांच्या २ गाई फुंदे यांच्या मालकीची १ गाय यांचा वीज पडून मृत्यू झाला. यात या शेतकऱ्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले.
छावणीत वीज पडल्याने विजेच्या कडकडाटाचा मोठा आवाज झाल्याने छावणीतील खुंटीला बांधलेल्या जनावरांनी दोर तोडून सैरावैरा पळ काढला. वीज गेल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी घटनास्थळाला भेट देवून ठार झालेल्या गाईंचा पंचनामा केला.