महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांचा अर्ज दाखल - Kopargaon Assembly Constituency

कोपरगाव मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.

अहमदनगरमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांचा अर्ज दाखल

By

Published : Oct 3, 2019, 9:22 PM IST

अहमदनगर- राज्यात काळे आणि कोल्हेंच्या राजकीय संघर्षाना नावाजलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्नेहलता या माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई असून भाजपने कोल्हे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. स्नेहलता कोल्हे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.

हेही वाचा -अहमदनगर : राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचितकडून मैदानात

नेवासा विधानसभा मतदारसंघ -

दुसरीकडे नेवासा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्याकडे दाखल केला. यावेळी शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना राधाकृष्ण विखे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, रिपाइंचे अशोक गायकवाड हे उपस्थित होते. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा - राम शिंदे आव्हान नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे माझ्या पुढील आव्हान - रोहित पवार

अकोले विधानसभा मतदारसंघ -

अकोले विधानसभा मतदारसंघातून वैभव पिचड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यालयापासून तहसील कार्यालयपर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करत पिचड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष सीताराम गायकर माजी मंत्री मधुकर पिचड उपस्थित होते.

वैभव पिचड, भाजप उमेदवार, अकोले विधानसभा मतदारसंघ

वैभव पिचड राष्ट्रवादी सोडून भाजपकडून निवडणूक लढवत असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षानेही आपली मोठी ताकत पिचडविरोधात लावल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून अकोले मतदारसंघातून पिचड विरोधात राष्ट्रवादीने डॉ. किरन लहामटे यांना उमेदवारी दिली आहे. किरण लहामटे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी लहामटे यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details