अहमदनगर - जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या जेल मधून दिनांक ९ फेब्रुवारीला रात्री गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींनी जेलचे छत तोडून पलायन केले होते. या फरार झालेल्या पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पुणे जिल्ह्यातून शोधण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप या सापडलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
कर्जत जेलमधून पळालेल्या पाच आरोपींपैकी तीन जणांना पुणे जिल्ह्यातून अटक
जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या जेल मधून ९ फेब्रुवारीला रात्री गंभीर गन्ह्यातील पाच आरोपींनी जेलचे छत तोडून पलायन केले होते. या फरारा आरोपींना पुणे जिल्ह्यातून शोधण्यात पोलिसांनी यश आले आहे.
खून, बलात्कार, अवैध शस्त्रे बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यातील हे पाच आरोपी कर्जत जेलच्या तीन नंबरच्या बराकीमधून ९ तारखेला रात्री फरार झाल्यानंतर पोलिसांची सात पथके त्यांचा शोध घेत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी कर्जत पोलीस ठाण्याला भेट देऊन जेलची पाहणी केली होती. आरोपीना पकडण्यासाठी सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या शोध मोहिमेत पुण्यातून तीन फरार झालेले आरोपी पकडण्यात यश आलेले असले तरी अजून अक्षय रामदास राऊत आणि चंद्रकांत महादेव राऊत या अद्याप फरार असलेल्या दोन आरोपींना जेरबंद करायचे बाकी आहे.