महाराष्ट्र

maharashtra

आंतरजातीय विवाहामुळे जीवे मारण्याची धमकी; कुटुंबाचे आमरण उपोषण

By

Published : Dec 7, 2019, 8:33 PM IST

तालुक्यातील वाकी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आसाराम तुळशीराम सावंत हे संपूर्ण कुटुंब आणि जनावरासह उपोषणाला बसले आहेत. सावंत यांनी जामखेड तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना २८ नोव्हेंबरला निवेदन दिले. मुलगा वैभव आसाराम सावंत याचे गावातील अनुराधा या मुलीसोबत प्रेमसंबंध होते.

threatened-to-kill-an-intercast-marriage-family-in-amhadnagar
कुटुंबाचे आमरण उपोषण

अहमदनगर - जामखेड तालुक्यात वाकी गावात आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांकडून नवविवाहित दाम्पत्याचा पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विवाह बदल्यात शेतजमीन व पैशाच्या रूपाने खंडणी मागितली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला संरक्षण मिळण्यासाठी जनावरासह तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. आज (शनिवारी) या उपोषणाचा दुसरा दिवस होता.

कुटुंबाचे अमरण उपोषण

हेही वाचा-भाजप प्रदेशाध्यक्ष आज जळगावात; खडसेंची नाराजी होणार का दूर ?

तालुक्यातील वाकी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आसाराम तुळशीराम सावंत हे संपूर्ण कुटुंब आणि जनावरासह उपोषणाला बसले आहेत. सावंत यांनी जामखेड तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना २८ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले. मुलगा वैभव आसाराम सावंत याचे गावातील अनुराधा या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी रितीरीवाजाप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे आळंदी येथे आंतरजातीय विवाह २९ डिसेंबर २०१८ रोजी केला. आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीकडचे गोरख रंगनाथ कोळेकर, चंद्रकांत युवराज महारनवर, मोहन गोरख कोळेकर, नितीन मोहन कोळेकर, गोटीराम मोहन कोळेकर यांनी रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ केली. तसेच दोन वेळा मारहाणही केली, असे निवेदनात म्हटले आहे.

दोन तोळे सोने, ५० हजार रोख व दोन एकर शेतीची मागणी त्यांनी केली होती. या त्रासामुळे गाव सोडून काही महिन्यापासून इतरत्र राहत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. जनावरांची देखभाल करण्यासाठी गावात येऊ दिले जात नाही. त्यामुळे आम्ही सर्व कुटुंब तणावाखाली आहोत. याबाबत लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण मिळावे या मागणीसाठी मुलगा वैभव सावंत, सुन अनुराधा सावंत व नातेवाईक तहसील कार्यालयासमोर शुक्रवार उपोषणाला बसले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details