महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंगापूर बंधाऱ्यात मळीमिश्रीत पाण्यामुळे हजारो मासे मृत, नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात - राहुरी बातमी बातमी

गंगापूर बंधाऱ्यात मळीमिश्रीत पाणी प्रवरा नदी प्रवाहात सोडले जाते. त्यामुळे हजारो मासे मृत झाल्याने नदीकाठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मृत मासे
मृत मासे

By

Published : Dec 23, 2020, 3:05 PM IST

राहुरी (अहमदनगर) - मळीमिश्रीत विषारी पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील आंबी येथील प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील चिंचोली, कुरणपूर, गंगापूर, मांडवे, गळनिंब, फत्याबाद आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिक हैराण झाले आहेत.

प्रवरा नदीमध्ये वरील भागातून मोठ्या प्रमाणात मळीमिश्रीत विषारी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सध्या गंगापूर, गळनिंब बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्या पाण्यात मळीमिश्रीत पाणी मिसळल्यामुळे नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून मेलेल्या माशांचा तवंग पाण्यावर साचला आहे. या मेलेल्या माशांमुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. बंधाऱ्यावरून नाकाला रुमाल बांधून जावे लागत आहे. हे दूषित पाणी पिल्यामुळे माणसे व जनावरे आजारी पडू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित विभागाने लक्ष घालून नदीकाठच्या लोकांना या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details