शिर्डी -राज्यात कोवीड 19 ची संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधीत होण्याची शक्यता लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनांसाठी साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीरामपुर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक' - डॉ.कृष्णकुमार चोथाणी - लहान मुलांना धोका अधिक
राज्यात कोवीड 19 ची संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधीत होण्याची शक्यता लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनांसाठी साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीरामपुर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
ऑनलाईन चर्चासत्र
या चर्चासत्रात बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी म्हणाले की, सध्या देशात व राज्यात दुसरी लाट सुरु असून लवकरच यात लहान मुलांना अधिक धोका आहे. ही बाब गंभीरपणे हाताळणे गरजेचे आहे. असे सांगून विशेष काळजी घेणे व योग्य औषधे आणि त्याचे प्रमाण याबाबत डॉ.चोथाणी यांनी मार्गदर्शन केले.