महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुक्यात हरवली साईबाबांची 'शिर्डी'; भाविकांनी घेतला वातावरणाचा आनंद - शिर्डी धुके न्यूज

सध्या राज्यातील वातावरणाचा कुणालाही अंदाज लावणे शक्य होत नाही. अचानक कधी पाऊस पडत आहे तर कधी थंडी वाढत आहे. शिर्डीमध्ये आज मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते.

fog
धुके

By

Published : Dec 15, 2020, 12:06 PM IST

अहमदनगर -जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. शिर्डीमध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात धुके पहायला मिळत आहे. त्यामुळे साईबाबांची शिर्डीनगरी धुक्यात हरवली होती. साईमंदिर परीसर आणि मंदिराचा कळसही पूर्णपणे धुक्याने आच्छादल्या होत्या.

भाविकांनी शिर्डीतील वातावरणाचा आनंद घेतला

रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत होत्या. लाईट सुरू ठेवून वाहने चालवावी लागत होती. मात्र, असे असले तरी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सकाळी नागरिक मोठ्या प्रमाणत घराबाहेर पडले होते. साईबाबांच्या दर्शानासाठी आलेल्या भाविकांनी या धुक्याचा आणि वातावरणाचा आनंद घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details