महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 7, 2023, 8:43 PM IST

ETV Bharat / state

Sanjay Raut On Loksabha Election : देशात 2024 मध्ये सत्ता परिवर्तन होईल, चीनच्या आक्रमणावर सरकार गप्प का? - संजय राऊत

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केंद्रात 2024 मध्ये सत्ता परिवर्तनाचे संकेत दिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये देशाचे भवितव्य ठरवतील असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Loksabha Election 2024
संजय राऊत

अहमदनगर :भारतावर चीनचे आक्रमण होत असूनही केंद्र शासनाने मौन बाळगल्याबद्दल राऊतांनी टीका केली. 2024 नंतर देशात नक्कीच सत्तापरिवर्तन होणार आहे. मी हे अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील एका कार्यक्रमात मुलाखत देताना केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष त्यांची शक्ती हिंदू-मुस्लिम दंगली भडकवण्यात आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण करण्यात करते.

भाजपचे हिंदुत्व चोरीचे आणि बोगस: चीनबाबत केंद्र सरकारच्या मौनावर टीका करत ते म्हणाले, मग चीनने घुसखोरी केल्यामुळे भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण का निर्माण होऊ नये? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनवर एक शब्दही उच्चारला नाही, असा आरोप राऊत यांनी केला. भाजपचे हिंदुत्व चोरीचे आणि बोगस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोदींच्या पात्रतेवर राऊतांचा मागणी: संजय राऊत यांनी यापूर्वीही केंद्र शासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती देण्यासाठी पुढे यावे, ते लपवण्याची काय गरज आहे असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधानांची पदवी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्यात येईल. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कायदेकर्त्यांना आणि देशाला जागरुक होऊ द्या, असे ते म्हणाले होते.

आरटीआय कायद्याचा गैरवापर: खासदार संजय राऊत सोमवारी म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश रद्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी टिप्पणी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पदवीची माहिती मागवली. केजरीवाल आणि सीआयसी दोघांचा दृष्टिकोन एकदम अनौपचारिक होता. हे लक्षात घेता, न्यायालयाने या प्रकरणात आरटीआय कायद्याचा अंदाधुंद गैरवापर झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

तर पदवी प्रदर्शित करा:सीआयसीच्या आदेशाविरुद्ध गुजरात विद्यापीठाच्या अपीलला अनुमती देताना न्यायमूर्ती बीरेन वैष्णव यांनी केजरीवाल यांच्यावर २५,००० रुपये दंड ठोठावला. राऊत यांनी सोमवारी सांगितले की, नरेंद्र मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकला आणि संपूर्ण राज्यशास्त्रात एमए केले. त्यांची पदवी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी बांधलेल्या नवीन संसद भवनाच्या भव्य प्रवेशद्वारावर त्यांची पदवी प्रदर्शित करा. संपूर्ण संसद आणि देशाला त्यांच्या शिक्षणाची जाणीव होऊ द्या. त्यामागील गूढ काय आहे, कोणी ते का लपवले ते समजेल.

हेही वाचा:Sanjay Raut Death Threat : संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या आरोपीची सर्च हिस्टरी आली समोर

ABOUT THE AUTHOR

...view details