अहमदनगर- शिर्डीतील खंडोबा मंदिरात शनिवारी रात्री चोरट्याने चक्क दानपेटीवरच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शिर्डीतील दानपेटीवरच चोराचा डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद - शिर्डीमध्ये मंदिरात चोरी
शहरातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरातील दानपेटीवर चोरट्याने डल्ला मारला. शनिवारी (15 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

दानपेटीवर चोराचा डल्ला
शिर्डीतील 'खंडोबा'च्या दानपेटीवर चोराचा डल्ला
यावेळी या चोराने मंदिरात प्रवेश करत आतील दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला एकच दान पेटी फोडता आली. या पेटीतील गेल्या 7 दिवसांत भक्तांनी दान म्हणून टाकलेली रक्कम चोराने लंपास केली आहे. मंदिर परिसरात वर्दळ असूनही चोरट्याने रक्कम लंपास केली आहे.