अहमदनगर - जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूची लागण झालेले २५ रुग्ण आहेत. यात तब्बल २१ रुग्ण हे दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ आणि मरकझ येऊन आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या मरकझमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा...EXCLUSIVE : निजामुद्दीनमधील संपूर्ण माहिती पोलिसांना होती, मरकझमधील उपस्थितासोबत खास बातचीत
अहमदनगर जिल्ह्यातील पहिला आणि दुसरा रुग्ण हे दुबईहुन आलेले जिल्ह्यातीलच नागरिक होते. त्यानंतरचे दोन रुग्ण स्थानिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले होते. त्यातील दुबईहून आलेले पहिले दोन रुग्ण चौदा दिवसांच्या उपचारानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, या पहिल्या चार रुग्णांनंतर मरकझ येथुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची साखळी २९ मार्चपासून सुरू झाल्याचे दिसत आहे.