महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्दी झाली की 7 दिवसांसाठी दुकान होणार सील, कोपरगाव पालिका प्रशासनाचे आदेश

कोपरगाव शहरात कोरोनामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जात आहे. दिपक इलेक्ट्रिकल या दुकानात 5 पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे हे दुकान सात दिवसांसाठी सील केले आहे.

By

Published : Mar 29, 2021, 4:46 PM IST

Updated : Mar 29, 2021, 5:28 PM IST

kopargaon
कोपरगाव

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात दररोज कोरना रुग्ण वाढत आहेत. दुकानात गर्दी करु नका, मास्क वापरा, असे वारंवार प्रशासनाकडून आहवानही केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी नियमांचे पालन केल जात नाही. त्यामुळे नियमांचे पालन न करणारी कोपरगाव शहरातील दुकाने आता सात दिवसांसाठी सील केली जात आहेत. याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

दिपक इलेक्ट्रिकल दुकानात 5 पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसली, सात दिवसांसाठी दुकान सील

कोपरगाव मधील हे दुकान 7 दिवसांसाठी सील -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. पण, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. कोपरगाव शहरातील दिपक इलेक्ट्रिकल या दुकानात 5 पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्याचे दिसले. त्यामुळे हे 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.

पोलीस, महसूल आणि पालिकेची कारवाई -

कोपरगाव शहरात दुकानांवर कारवाई केली जात आहे. पोलीस प्रशासन, महसूल तसेच पालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. तरी दुकानदारांनी तसेच नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी केले आहे.

हेही वाचा -बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह, नालासोपाऱ्यातील घटना

हेही वाचा -चोपडा येथे पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे अधीक्षकांचे स्पष्टीकरण

Last Updated : Mar 29, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details