महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रपती राजवटीमुळे खासदार या नात्याने जबाबदारी वाढली - खासदार सुजय विखे - politics news

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या परिस्थितीत मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने ते खासदार या नात्याने सोडवणे गरजेचे असल्याने आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.

खासदार सुजय विखे

By

Published : Nov 14, 2019, 9:36 AM IST

अहमदनगर- युतीला बहूमत असताना मात्र राजकीय परस्थिती जुळून न आल्याने एकीकडे सरकार स्थापन न होता, दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या परिस्थितीत मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने ते खासदार या नात्याने सोडवणे गरजेचे असल्याने आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.

खासदार सुजय विखे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा -महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

अतिवृष्टी, रस्ते, वीज आदी प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आपण संबंधित यंत्रणेला पाठपुरावा करत असल्याचे ते म्हणाले. नगर जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने टीका होत असली तरी त्याची चिंता करत नसल्याचे सांगताना सुजय यांनी विखे परिवाराला यापूर्वीही अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे, मात्र आमचा परिवार टीकेला उत्तर न देता सामान्य जनतेसाठी काम करत आला आहे आणि यापुढेही आम्ही काम करत राहू असे सांगितले. लवकरच नगर शहर परिसरात संपर्क कार्यालय सुरू होणार असून त्या माध्यमातून जनतेसाठी विविध कामासाठी उपलब्द्ध असू, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details