अहमदनगर :अमित चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची तयारी करीत असताना त्यांच्या मोबाईलवर सागर गवासणे याने मोबाईलवर फोन करून तुम्ही राम शिंदे साहेबांचे जवळचे आहात. त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहून घेईन अशी धमकी दिली. तसेच फेसबुक लाईव्ह करून आमदार राम शिंदे साहेब व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन, अशी धमकी दिली. दोन राजकीय पक्षातील लोकांमध्ये तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. या घटने बाबत फिर्यादी यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरून जामखेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीचे आदेश:घटना घडल्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून घटनेचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, राम माळी, रविंद्र कर्डिले, पोना/सचिन अडबल, प्रशांत राठोड, राहुल गुड्डू, मेघराज कोल्हे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणूक करून आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या.