अहमदनगर (कोपरगाव) - कोपरगाव तालुक्यातील मनेगाव शिवारात संतापजनक घटना घडलीय. जन्मदात्या आईनेच आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला परपुरुषाशी संबध ठेवण्यास भाग पाडले आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तसेच मुलीच्या आई विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sexual Relations: परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास आईने केला मुलीचा सौदा; दोघांना अटक - Thirteen year old girl sexual relations with a man
कोपरगाव तालुक्यातील मनेगाव शिवारात संतापजनक घटना घडलीय. जन्मदात्या आईनेच आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला परपुरुषाशी संबध ठेवण्यास भाग पाडले आहे. (Sexual Relations) याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तसेच मुलीच्या आई विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Sexual Relations: परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास आईने केला मुलीचा सौदा; दोघांना अटक अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16401963-294-16401963-1663434641769.jpg)
कोपरगाव तालुक्यातील मनेगाव शिवारातील जन्मदात्या आईनेच तू आता वयात आल्याने आपल्या समाजाची चालीरिती म्हणून तुला परपुरुषाशी संबंध ठेवावे लागतील. तेव्हा या मुलीने आईला मला शाळा शिकायची आहे. माझे वय नाही. मी असे घाणेरडे काम करणार नाही असे सांगून तिने आपल्या आईला विरोध केला. पीडिताची आई तिला म्हणाली आपल्या समाजामध्ये असे करावे लागते. मीसुध्दा हेच केले आहे. तू जर असे केले नाही तर तुझ्याकडे पाहावे लागेल. अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी आबासाहेब भडांगे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला तिच्या आईच्या घरातील एका खोलीत घेवून गेला व तिचे इच्छेविरुध्द संबंध ठेवले.
याबाबत पीडित मुलीच्या वतीने तिचा मामेभाऊ याने राहाता पोलीस स्टेशनला 16 सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली. आरोपीस पीडिताची आईने संगनमत करुन मदत केली. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी पीडिताची आई तसेच आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपींना राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत.