पाथर्डी (अहमदनगर) -पाथर्डीमधील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा झालेला मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाथर्डीतून बिबट्याने परत एका मुलाला पळविले - अहमदनगर बिबट्या बातमी
शनिवारी रात्री सक्षम घराच्या पडवीत झोपला होता. रविवारी पहाटे त्यास बिबट्याने हल्ला करून पळवून नेले. नातेवाईक व वन विभागाच्या मदतीने पहाटेपासून शोध घेण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता सक्षमचा मृतदेह शेजारीच असलेल्या तुरीच्या पिकात आढळून आला.
रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याने हल्ला केला. यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सक्षम गणेश आठरे (वय ८) असे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. हा मुलगा शनिवारी रात्री सक्षम घराच्या पडवीत झोपला होता. रविवारी पहाटे त्यास बिबट्याने हल्ला करून पळवून नेले. नातेवाईक व वन विभागाच्या मदतीने पहाटेपासून शोध घेण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता सक्षमचा मृतदेह शेजारीच असलेल्या तुरीच्या पिकात आढळून आला.