महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोंभाळणेमध्ये चार घरांना आग, लाखोंचे नुकसान - अहमदनगर जिल्हा लेटेस्ट न्यूज

अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. घर जळाल्याने या कुटुबीयांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेत सर्व जिवनपयोगी साहीत्य जळून खाक झाले आहे. त्यामध्ये शेळ्या, दुचाकी, पैसे, धान्य, कपडे अशा गोष्टींचा समावेश आहे.

कोंभाळणेमध्ये चार घरांना आग, लाखोंचे नुकसान
कोंभाळणेमध्ये चार घरांना आग, लाखोंचे नुकसान

By

Published : Apr 4, 2021, 3:43 PM IST

अहमदनगर -अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. घर जळाल्याने या कुटुबीयांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेत सर्व जिवनपयोगी साहीत्य जळून खाक झाले आहे. त्यामध्ये शेळ्या, दुचाकी, पैसे, धान्य, कपडे अशा गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान अज्ञाताने घराला आग लावल्याचा आरोप पीडित गावंडे कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ठाकर वस्ती आहे. तिथे युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, सखुबाई गावंडे असे चार कुटुंब वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी गावंडे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेरला गेले होते. घरात केवळ दोन महिला आणि छोटी मुले होते. सकाळी आकराच्या दरम्यान घराला आग लागली. घराला आग लागल्याचे कळताच या महिलांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळपास पाणी नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या आगीमध्ये एका लहान मुलाची सायकल देखील जळाली आहे, सायकल जळाल्यानंतर हा मुलगा त्या सायकलकडे सुन्न नजरेने पाहात आहे. हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोंभाळणेमध्ये चार घरांना आग, लाखोंचे नुकसान

कुटुंबीयांकडून नुकसान भरपाईची मागणी

या घटनेत घरातील 40 पोते धान्य, शेळ्या, पैसे, कागदपत्रे, जळून खाक झाले आहे. घर जळाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान घरात झोपलेला दोन वर्षांचा मुलगा सखुबाई गावंडे यांनी आगीत घुसून बाहेर काढला. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्थानिक तलाठी उपलब्ध नसल्याने, सर्कल कुलकर्णी व समशेरपूर येथील तलाठी पाठवून पंचनामा केला. पोलीस पाटील यांनी याबाबत अकोले पोलिसांना माहिती दिली असून, अकोले पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गावंडे कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याबाबत माजी आमदरा वैभव पिचड यांनी पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधून, त्यांच्या व्याथा जाणून घेतल्या, तसेच त्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा -वाशिममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा

ABOUT THE AUTHOR

...view details