अहमदनगर- साईचरणी एका भक्ताने तब्बल ७ हजार ७४० किलो केसर आंबा अर्पण केला आहे. या दान केलेल्या आंब्याचा प्रसाद भक्तांना देण्याचे ठरविले आहे. यासाठी साई संस्थानने आंब्याचे आमरस पुरीचा बेत भक्तांसाठी आखला आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांनी दिलेल्या आंब्याच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेतला.
साईभक्ताने दान दिलेल्या आंब्याचा भक्तांना आमरस पुरीचा प्रसाद - साई भक्त
साईचरणी एका भक्ताने तब्बल ७ हजार ७४० किलो केसर आंबा अर्पण केला आहे. या दान केलेल्या आंब्याचा प्रसाद भक्तांना देण्याचे ठरविले आहे. यासाठी साई संस्थानने आंब्याचे आमरस पुरीचा बेत भक्तांसाठी आखला आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांनी दिलेल्या आंब्याच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेतला.
शिर्डीत प्रत्येक भक्त साई दर्शनासाठी आल्यानंतर आपल्या कुवती प्रमाणे दान करत असतो. सुगीच्या हंगामात शेतकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्यामधील काही धान्य दान करतात. तर काही शेतकरी भाजीपाला दान करतात. या व्यतिरिक्त साईभक्त पैसे, सोने, चांदी, हिरे मोतीही दान करतात. मात्र साईभक्त असलेल्या दिपक करगळ यांनी साई चरणी तब्बल ७ हजार ७४० किलो केशर आंबा अर्पण केला आहे. या आब्यांचा रस आणि पुरीचा बेत भक्तांनी देण्यात आला. .
साई संस्थानमार्फत साईभक्तांच्या देणगीतुन साई प्रसादलयात भक्तांना मोफत जेवन देण्यात येते. हे प्रसादलय सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत अखंड चालू असते. संस्थान भोजनालयात दररोज किमान ४० ते ४५ हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. आज साई प्रसादलयात येणाऱ्या सगळ्या भाविकांना आमरस पुरीच्या भोजनाचा आस्वाद घेतला.