अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी इथे अंगणवाडी सेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर तिने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र माहेरच्या लोकांनी सासरच्यांनी या तिघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला असून पोलीस सर्व दृष्टींनी तपास करत आहेत.
पोटच्या दोन मुलांची हत्या करून अंगणवाडी सेविकेची गळफास घेऊन आत्महत्या! - mother suicide news
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी इथे अंगणवाडी सेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उज्वला संदीप जाधव (वय २४), राजवीर (वय ५), उत्कर्षा (वय ८ महिने,) तिघे रा. झिजेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर ही मयतांची नावे आहेत. राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत अंगणवाडी सेविका उज्वला जाधव हिचा मृतदेह आढळून आला. तर दोन मुलांचे मृतदेह पलंगावर होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संजय सावंत यांच्यासह कर्जत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
उज्वला जाधव यांचा खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.