महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईंच्या नगरीत तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात, यंदाचे वर्ष 111 वे

शिर्डीत तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचे हे 111 वे वर्ष आहे.

साईंच्या नगरीत तीन दिवशीय गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात

By

Published : Jul 15, 2019, 12:07 PM IST

शिर्डी- साई नगरी शिर्डीत तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचे हे 111 वे वर्ष आहे. यावेळी साईनामाचा जयघोष करत पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. सोमवारी सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतीमा, वीणा आणि साईचरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाई पर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमीत्त साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

साईंच्या नगरीत तीन दिवशीय गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात

पहाटे काकड आरती नंतर साईंच्या मुर्तीस आणि समाधीस मंगल स्नान घालण्यात आले. त्यानंतर साईंच्या मंदिरातून साईंचा फोटो, विणा आणि साई चरीत्राच्या ग्रंथाची मिरवणूक मंदिरातून गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात आली.

काकड आरती

द्वारकामाईत विधीवत पूजा करत साई चरीत्राच्या अखंड पारायणाच्या पठणास सुरुवात करण्यात आली. भाविक साईच्या चरीत्राचे अखंड पठण करणार असू मंगळवारी सकाळी या पठणाची सांगता केली जाणार आहे. गुरु पोर्णिमा उत्सवाच्या निमीत्ताने साई मंदीर परिसर आणि गर्भगृहास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details