महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर वीज वितरणाचा सहायक अभियंता दुसऱ्यांदा लाच घेताना जाळ्यात

सीबीचे पथक भाळवणीच्या वीज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयात दाखल झाले. आणि सापळा रचत अभियंता पगारे याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर वीज वितरणाचा सहायक अभियंता दुसऱ्यांदा लाचेच्या जाळ्यात..
अहमदनगर वीज वितरणाचा सहायक अभियंता दुसऱ्यांदा लाचेच्या जाळ्यात..

By

Published : Sep 29, 2020, 4:20 PM IST

अहमदनगर - पारनेर तालुक्यातल्या भाळवणीच्या वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातल्या सहायक अभियंत्याला ४ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाऊसाहेब गोविंद पगारे असं त्याचं नाव असून अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. यापूर्वीही 2004साली पगारे याला लाच घेतल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले होते.

पारनेर तालुक्यातल्या जामगावच्या कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी २०२०मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शनसाठी कोटेशन भरले होते. मात्र, कोटेशन मंजूर होऊनही सहायक अभियंता पगारे यांनी केवळ पैशासाठी त्यांना वीजमीटर दिले नाही. त्यामुळे मीटरच्या मागणीसाठी कैलास शिंदे यांनी आज पगारे यांची भेट घेतली. त्यावेळी मीटर देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी पगारे यांनी शिंदे यांच्याकडे केली. परंतू हा व्यवहार ४ हजार रुपयांवर ठरला. तत्पूर्वी शिंदे यांनी अहमदनगरमधील लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिली.

त्यानंतर एसीबीचे पथक भाळवणीच्या वीज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयात दाखल झाले. आणि सापळा रचत अभियंता पगारे याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पगारे याने यापूर्वी अनेक शेतकऱ्यांकडून लाच घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details