महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Group attack on Pimpale Family : श्रीरामपूरमध्ये जुन्या वादातून तलवारीने तुफान हाणामारी, 3 जण गंभीर - जुन्या वादातून पिंपळे कुटुंबियांवर जमावाचा हल्ला

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील वडाळामहादेव (WadalaMahadev) येथील पिंपळे कुटुंबियांवर (Attack on Pimpale Family) जवळपास 20 ते 25 जणांनी तलवार, काठ्यांनी हल्ला केला. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. सशस्त्र हल्ला प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shrirampur police
श्रीरामपूर पोलीस स्टेशन

By

Published : Jan 20, 2022, 3:15 PM IST

शिर्डी -कार्यक्रमासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथून आलेल्या 20 ते 25 पाहुण्यांनी पिंपळे कुटुंबियांवर जुन्या वादाचा राग मनात धरून तलवारी, कुऱ्हाडी, लाकडी दांडे व गजाकाठ्यांनी हल्ला (Attack on Pimpale Family) केल्याची घटना घडली. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील वडाळामहादेव (WadalaMahadev) येथील पिंपळे यांच्या घरी हा प्रकार घडला. या वादात पिंपळे यांच्या घरातील 3 जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -Attacking Dogs : कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, बालकांवर जीवघेणा हल्ला

  • महिलांसह लहानग्यांवर केला हल्ला -

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथील अनिल पिंपळे यांच्या घरी कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथून एमएच 20 डी व्ही 7330 व एमएच 12 एचव्ही 9242 या गाडीतून आलेल्या, अंदाजे 24 ते 25 जणांनी, जेवणास बसलेल्या महिला, पुरुषांसह लहान मुलामुलींवर जीवघेणा सशस्त्र हल्ला केला. एवढेच नाही तर जीवे मारण्याच्या उद्देशाने आलेल्या माणसांनी महिलांच्या अंगावर हात टाकून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. सदरच्या हल्ल्यात राजू गंगाधर चव्हाण व अनिल बबन पिंपळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • काय आहे प्रकरण?

20 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास देविदास पिंपळे यांच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात रुपचंद चव्हाण यास संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तुमच्यामुळेच आमचा माणूस जेलमध्ये आहे. तुम्ही आमच्या माणसाला सोडवा, नाहीतर तुमच्या घरातील लोकांचे तुकडे तुकडे करून टाकू, अशी धमकी 18 जानेवारीला सुरेश शंकर पिंपळे (रा. औरंगाबाद) यांनी दिली होती. यासंदर्भात लखन बबन पिंपळे यांनी अशोकनगर पोलीस निवारा कक्षात लेखी तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी सदर अर्जाचे गांभीर्य घेतले नाही आणि औरंगाबाद येथून आलेल्या लोकांनी सशस्त्र हल्ला केला. यात एमएच 13 एचव्ही 9242 या गाडीतून आलेले लोक पसार होण्यास यशस्वी झाले, तर एमएच 20 डीव्ही 7330 गाडीतील 10 ते 12 लोकांना,स्थानिक ग्रामस्थांनी गाडीसह पोलिसांना पकडून दिले आहेत. सदरचा सशस्त्र हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध, सशस्त्र दरोडा, प्राणघातक हल्ला, तसेच महिलांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पिंपळे कुटुंबीयांनी केली आहे. भविष्यात सदरच्या लोकांकडून कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची भीती देखील पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. वडाळामहादेव येथील सशस्त्र हल्ला प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -Baramati Ccimr : बारामतीत युवतीवर चाकू हल्ला; पाहा VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details