अहमदनगर - स्वर्णम चव्हाण उर्फ डुग्गु ( Swarnav Chavan Found ) सापडल्याने अख्या महाराष्ट्राला आनंद झाला होता. याच आनंदात नांदेडस्थीत स्वर्णमची आत्या, आपले पती आणि दोन मुलांसह त्याला आणि चव्हाण कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याकडे जात असताना रात्रीच्या ( Swarnam Chavan Aunty Car Accident ) सुमारास नगर शहराजवळ इंद्रायणी हॉटेल इथे त्यांच्या वाहन डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघात झाला आणि दुर्दैवाने यात स्वर्णमची आत्या सुनंदा संतोष राठोड (36) रा. नांदेड यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती संतोष राठोड हे किरकोळ जखमी असून दोन मुले मात्र हे गंभीर जखमी झाले.
Swarnam Chavan Relative Accident : धक्कादायक! स्वर्णमला भेटायला निघालेल्या त्याच्या आत्याचा वाहन अपघातात मृत्यू, दोघे गंभीर - स्वर्णम चव्हाण नातेवाईक अपघात
स्वर्णम चव्हाण उर्फ डुग्गु ( Swarnav Chavan Found ) सापडल्याने अख्या महाराष्ट्राला आनंद झाला होता. याच आनंदात नांदेडस्थीत स्वर्णमची आत्या, आपले पती आणि दोन मुलांसह त्याला आणि चव्हाण कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याकडे जात असताना रात्रीच्या ( Swarnam Chavan Aunty Car Accident ) सुमारास नगर शहराजवळ इंद्रायणी हॉटेल इथे त्यांच्या वाहन डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघात झाला.
![Swarnam Chavan Relative Accident : धक्कादायक! स्वर्णमला भेटायला निघालेल्या त्याच्या आत्याचा वाहन अपघातात मृत्यू, दोघे गंभीर Swarnam Chavan Relative Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14235323-thumbnail-3x2-nagaracci.jpg)
Swarnam Chavan Relative Accident
व्हिडीओ
दरम्यान, पुण्यातील बाणेर परिसरातील हायस्ट्रीट परिसरातून काही दिवसांपूर्वी स्वर्णम चव्हाण उर्फ डुग्गु याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. बुधवारी अपहरणकर्त्याने त्याला वाकड जवळील पुनावळे पुलाजवळ सोडले. यानंतर त्याला पोलिसांच्या माध्यमातून सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्याला भेटायसाठीच त्याची आत्या आपल्या परिवारासह पुण्याला जात होते.
Last Updated : Jan 20, 2022, 3:58 PM IST