अहमदनगर - राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षित बेरोजगारांना काम नाही. अनेक कोरोनाबाधितांना उपचार मिळत नाहीत. मात्र, एका अभिनेत्याच्या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
अहमदनगरमध्ये आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला वाढीव भाव मिळावा, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी आपले आंदोलन हे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आहे. भाजपने केवळ राजकारणासाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. मात्र, केंद्राच्या भूमिकेविरोधात ते शांत आहेत, असा आरोप केला.