शिर्डी : जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिर ( World famous Shirdi Saibaba Temple ) कलशारोहणाला आज सत्तर वर्ष पूर्ण झाले आहे. डॉ. पारनेरकरांच्या पादुका पूजन व सुवर्ण कलशाच्या प्रतिमेच्या पूजन करून सत्तरवा वर्धापन दिन शिर्डीत साजरा करण्यात आला आहे. ( Suvarna Kalash Rohan)
आणि बुटीवाडा साईमंदीर झाले : साई मंदीर मुळात नागपूरच्या बुटी सरकारांचा वाडा होता. त्या वाड्याला नंतर मंदीरात रुपांतरीत करत त्यात श्रीकृष्ण आणि रामाच्या मुर्ती बसविण्यात येणार होत्या. मात्र साईबाबांनीच मला या मंदीरात विश्रांत घ्यावयाची असल्याच सांगीतल्यानंतर साईच्या महानिर्वाणानंतर साईबाबांचा देह ठेवत समाधीस्थ करण्यात आला आणि बुटीवाडा साईमंदीर झाले ते साल होते 1918 याच साई मंदीराचा 1952 साली मंदीराच्या सभा मंडापाचे काम पुर्ण झाले. त्यानंतर कलशारोहन करायचे होते एरवी मंदीराच्या कलशा रोहनाचा अधिकार हा ब्रम्हचारी आणि सन्यास आश्रम स्विकारलेल्या व्यक्तीस असतो. मात्र साईबाबांच्या जशा लिला अनोख्या होत्या तशी कलशा रोहनाची कहानी ही वेगळी आहे.
कलशा रोहनाची कहानी :नगर जिल्ह्यातील पुर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज जे प्रापंचिक व्यक्ती होते त्यांच्या हस्ते 29 सप्टेंबर 1952 साली साईमंदीरावर सुवर्ण कलशारोहन पार पडले होते. या सोहळ्यास आज सत्तर वर्षे पुर्ण झाली आहेत. गेल्या काही वर्षापासुन 29 सप्टेंबरला शिर्डीत सुवर्ण कलशारोहण स्म्रतीदिन म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षी शिर्डी ग्रामस्थ आणि पारनेरकर गुरु सेवा मंडळाच्या वतीने सुवर्ण कलशारोहणाचा स्म्रुती दिवस साजरा करण्यात आला.
कलशारोहन स्मृतिदिन :साईमंदीराच्या चार नंबर प्रवेशद्वार जवळ साईमंदीराच्या कलशाची प्रतीक्रुती आणि साईमुर्ती तसेच पारनेरकर महाराजांच्या पादुकांचे पुजन करण्यात आले. यासाठी सुनील जोशी व शिर्डीतील संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साईबाबा समवेत असणाऱ्या सर्व घटना व समकालीन संतांच्या अभ्यास करून जतन केले पाहिजे. दासगणू महाराज जयंती आम्हीं साजरी केली आता तो कार्यक्रम साई संस्थान करते भविष्यात हा कलशारोहन स्मृतिदिन सुद्धा संस्थान करेल अशी अपेक्षाही संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी व्यक्त केली.