शिर्डी(अहमदनगर) - सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड (Supreme Court judge Dhananjaya Chandrachud) यांनी आज (२६ फेब्रुवारी) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Saibaba Darshan Shirdi) घेतले. या दरम्यान चंद्रचुड यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करत साईबाबांची पूजा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी घेतले साईबाबांचे दर्शन - न्यायमूर्ती डॉ धनंजय चंद्रचुड साईबाबा दर्शन
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड (Supreme Court judge Dhananjaya Chandrachud) यांनी आज (२६ फेब्रुवारी) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Saibaba Darshan Shirdi) घेतले. या दरम्यान चंद्रचुड यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती केली.
या दरम्यान साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी चंद्रचुड यांचा शल, साई मूर्ती देऊन सन्मान केला. साईबाबांच्या दर्शनापूर्वी शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांचे आगमन झाले. तेथे त्यांचे स्वागत शिर्डी उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा यांनी केले. साईबाबा मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कोपरगाव दिवाणी न्यायाधीश व्ही. यू. मिसाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे आदी उपस्थित होते.